अवघ्या देशात जोशजोमात साजरा होणारा गणेशोत्सव आता कांही दिवसांवर आला आहे आणि यंदाही बाप्पा अनेकविध रूपांनी भाविकांच्या घरी अवतरणार आहेत. गणेश कलाकार चालू ट्रेंडच्या कौशल्याने उपयोग करून दरवर्षी नवीन प्रतिमेतील गणपती बनवित असतात व त्याला चांगली लोकप्रियताही मिळते. यंदा जगभरात उत्पन्नाचे रेकार्ड नोंदविलेल्या प्रभासच्या बाहुबली रूपातील गणेशाला भाविकांकडून खूप मागणी आहे.
यंदा बाहुबलीच्या रुपात अवतरणार बाप्पा
मिळालेल्या माहितीनुसार मूर्तीकारांनी खांद्यावर शिवलिंग घेतलेल्या तसेच हत्तीवर विराजमान झालेल्या व हातात धनुष्य बाण असलेल्या गणेशाचा प्रतिमा साकारल्या आहेत. यावर प्रभासच्या बाहुबलीचा स्पष्ट ठसा उमटल्याचे दिसून येत आहे. कारण नेहमीचे लंबोदर बाप्पा या प्रतिमांमध्ये पोटाचे सिकस पॅक दाखविताना दिसत आहेत.
Lord Ganesh tobe seen in Bahubali avatar