अॅन्ड्रॉईड युजरसाठी खुशखबर; नवी ऑपरेटिंग सिस्टीम


मुंबई – यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहताना चॅट,फोनमध्ये मल्टी-विंडो ,व्ह्यू चा वापर ,एकसारख्या नोटिफिकेशन असणाऱ्या अॅप्सना एकत्र आणणे,फोनमधील आयकॅान स्वतः कस्टमाइज करणे यासह विविध फीचर्सचा समावेश असलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अॅन्ड्रॉईड युजरसाठी आता नव्याने मिळणार आहे.

गूगलने ‘अॅन्ड्रॉईड ओ’ ही नवी ऑपरेटींग सिस्टम लाँच केली आहे. अॅन्ड्रॉईडने आपल्या सिस्टीम्सना खाद्यपदार्थांनी नावे देण्याची मालिका कायम राखत या सिस्टीमला ‘ओरिओ’ नाव दिले आहे. गुगलकडून लॉन्च करण्यात आलेली नवी ऑपरेटिंग सिस्टीम अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे अनेक बदल तुमच्या फोनमध्ये होणार आहेत.कशी आहे ही नवीन सिस्टीम : यू-ट्यूबवर व्हिडिओ पाहताना चॅटही करू शकता,फोनमध्ये मल्टी-विंडो व्ह्यू वापरला जाऊ शकतो, एकसारख्या नोटिफिकेशन असणाऱ्या अॅप्सना एकत्र करणार, नेव्हिगेशनची प्रक्रिया सोपी होऊन डेव्हलपर्स व युजर्स दोघांनीही फायदा,फोनमधील आयकॅान स्वतः कस्टमाइज करू शकता, डेव्हलपर्स त्यांच्या अॅप्सचे एरर व क्रॅश स्वताः सुधारू शकता,तसेच अँड्रॉईड ७.० वापरत असाल तर तुम्ही अशा अॅप्सना बंद करू शकता. ज्यामुळे तुमची बॅटरी जास्त वापरली जाणार नाही.

Leave a Comment