शाओमी रेडमी नोट फाईव्ह ए लाँच


शाओमीने त्यांचे पुढचे रेडमी नोट फाईव्ह एक हे मॉर्डल र्स्टंडर्ड व हाय एडिशन मध्ये सादर केले असून ते तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केले गेले आहे. स्टँडर्ड मॉडेल २ जीबी रॅम व १६ जीबी इंटरनल स्टोरेजसह असून त्याची किंमत ६७०० रूपये आहे. बाकीची दोन प्रिमियम मॉडेल्स फिंगरप्रिट स्कॅनरसह आहेत.त्यात एक ३ जीबी रॅम व ३२ जीबी मेमरीसह आहे तर दुसरे ४ जीबी रॅम व ६४ जीबी मेमरीसह आहे. या तिन्ही व्हेरिएंटची मेमरी मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. चीनच्या स्थानिक बाजारात ही मॉडेल्स शँपेन गोल्ड, रोझ गोल्ड व प्लानिटम सिल्व्हर रंगात असून मंगळवार पासून त्यांची विक्री सुरू होत आहे.

स्टंडर्ड मॉडेलला दोन सिम, मायक्रो एसडी सह ५.५ इंची एचडी डिस्प्ले दिला गेला आहे. २ जीबी साठी १३ एमपीचा रियर एलईडी फ्लॅशसह कॅमेरा , ५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे. तर हाय एडिशनसाठी ५.५ इंची एचडी डिस्प्ले, २.५ डी कॉर्निंग ग्लास प्रोटेक्शनसह आहे. स्नॅपडॅगन ४३५ प्रोसेसर, २ सिम, १६ एमपीचा फ्रंट तर १३ एमपीचा प्रायमरी कॅमेरा आहे. अॅड्राईड नगेटवर आधारित मीयूआय ओएस आहे. ३ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेजची किंमत ८६०० रूपये तर ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजची किंमत ११५०० रूपये आहे. हे फोन भारतात कधी लाँच होणार याचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही.

Leave a Comment