वंडरलँड इंफाळ


हिमालयाच्या पूर्वकडे असलेल्या मणिपूर राज्याची राजधानी इंफाळला निसर्गाच्या सौदर्याचा वरदहस्त लाभला आहे. इंफाळला मणिपूरचे वंडरलँड म्हटले जाते. येथील उत्सवप्रिय नागरिक, प्राचीन वास्त, कला संस्कृती व भारताच्या सप्तरंगी संस्कृतची येथे राखली जाणारी बूज इंफाळला आणखी वेगळे सौंदर्य प्रदान करतेच पण पर्यटकांना आकर्षित करण्याचे मोठे कामही करते. उंचउंच डोंगररांगाच्या उतारावरची हिरवीगार मखमल, नुसती न्याहाळावीत अशी परिकथेतल्या सारखी छोटी छोटी गांवे वस्त्या यामुळे इंफाळमध्ये आल्यावर एखाद्या जादुई दुनियेत आल्याचा भास होतो.


इको टूरिझम मध्ये ज्यांना रस आहे त्यांच्यासाठी इंफाळ स्वर्गच म्हणायला हवा. येथील लोकटक सरोवर मणिपूरमधील सर्वात मोठे फ्रेश पाण्याचे सरोवर असून यात अनेक तरंगती बेटे आहेत. या सरोवरात २३३ जलचर वनस्पती, १०० जातीचे पक्षी, ४२५ जातीचे जंगली जीव गुण्यागोविदाने नांदतात. तरंगच्या बेटांवर मच्छीमारांची वस्ती आहे. इंफाळमध्येच आशियातील सर्वात मोठे महिलांनी चालविलेले इमा मार्कट किंवा मदर मार्केट पाहायला मिळते. १६ व्या शतकापासून हे मार्केट अस्तित्त्वात आहे व आजघडीला येथे ४ हजार महिला दुकानदार आहेत.


या मार्केटच्या मागे लागूनच जगातील सर्वात मोठे पोलो मैदान आहे. मापाल कंगजेबुंग नावाच्या या मैदानावर पोलोच्या वार्षिक स्पर्धा भरतात व त्यात भाग घेण्यासाठी जगभरातून टीम येतात. एकट्या मणिपूरमध्ये ३५ पोलो क्लब आहेत. येथे आढळणारी शिरोड लिली ही खास फुलवनस्पती. मणिपूरला तसेही आर्किड बास्केट म्हटले जाते. येथे ५०० जातींची आर्किड सापडतात पण शिरोड हिल्स वर येणारी ही आर्किड लिली फक्त मणिपूरमध्येच उगवते तीही पावसाळ्यातच. मायक्रोस्कोपखाली पाहिले तर तिचे सात रंग दिसतात.

येथे उभारला गेलेला शहीद मिनारही आवर्जून भेट देण्यासारखा. इंग्रजांशी लढताना १८९१ मध्ये ज्या आदिवासी योद्धांच्या देहाच्या आहुती पडल्या त्यांच्या स्मरणार्थ हा उभारण्यात आला आहे. राष्ट्रीय संग्रहालयालाही भेट द्यायला हवी तसेच कांगडा पॅलेस हा पॅगोडाच्या धर्तीवर बंाधला गेलेला पॅलेसही आवर्जून पाहायला हवा. या पॅलेसचा दरवाजा चीनी पद्धतीचा असून येथे सात राजांनी वास्तव्य केले होते. येथे असलेले लॉर्ड सामन टेंपल हे सूर्याला समर्पित आहे.

Leave a Comment