रशियन रोसनेफ्टने खरेदी केली एस्सार ऑईल


रशियाच्या रोसनेफ्टने भारतातील दोन नंबरची मोठी खासगी क्षेत्रातील कंपनी एस्सार ऑईल खरेदी केली असून हा सौदा १२.९ अब्ज डॉलर्स म्हणजे ८३ हजार कोटींना पूर्ण केला गेला. हा सौदा भारतात झालेला सर्वात मोठा एफडीआय सौदा ठरला आहे तसेच रशियाची ही भारतातील सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे.

वास्तविक गतवर्षीच पंतप्रधान मोदी व रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन यांच्या उपस्थितीत या सौद्याची घोषणा केली गेली होती. गतवर्षी गोवा ब्रिक्स संमेलनात १५ आक्टोबरला ही घोषणा झाली त्यानंतर १० महिन्यांनी हा सौदा पूर्ण झाला आहे. एस्सार ऑईलने कर्ज घेतलेल्या बँकांनी कंपनीकडे ४५ हजार कोटींची मागणी केल्यामुळे हा सौदा विलंबाने झाल्याचे समजते. या सौद्यानुसार रोसनेफटला एस्सारची गुजराथेतील २० दशलक्ष टन क्षमतेची रिफायनरी, एक कॅप्टीव पॉवर प्लांट, १ कॅप्टीव्ह बंदर व ३५०० पेट्रोल पंप मिळाले आहेत.

एस्सारचे प्रमुख प्रशांत रूईया या संदर्भात माहिती देताना म्हणाले की कंपनी विक्रीतून आलेल्या रकमेपैकी ७० हजार कोटीची कर्जफेड केली जाणार आहे. यामुळे कंपनीचे ६० टक्के कर्ज कमी होणार आहे.

Leave a Comment