भीम अॅपवरील कॅशबॅक सुविधेची मर्यादा सरकारने वाढवली !


नवी दिल्ली : भीम अॅपवर असणारी कॅशबॅक सुविधा सरकारने पुढील वर्ष मार्चपर्यंत वाढवली आहे. या योजनेचा लाभ घेत भीम अॅपद्वारे पैसे स्वीकारणाऱ्या दुकानदारांना १००० रुपयांपर्यंत कॅशबॅक दिले जाईल.

ही योजना ३१ मार्च २०१८ पर्यंत चालू राहणार असल्याचे इलेक्ट्रॉनिक्स आणि औद्योगिक मंत्रालयातून सादर करण्यात आलेल्या अहवालात म्हटले आहे. कॅशलेस पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी १४ एप्रिलला ६ महिन्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही योजना सुरु केली होती. अगोदर या योजनेतून दुकानदारांना २० ते ५० रुपयांच्या वसुलीवर ५० रुपये कॅशबॅक मिळत होते. त्यानंतर ९५० रुपयांच्या प्रत्येक देवाणघेवाणीवर २ रुपये कॅशबॅक मिळत होते. भीम कॅशबॅक योजनेची मासिक मर्यादा १००० रुपये ऐवढी आहे.

Leave a Comment