जपानमध्ये बौद्धरोबो करणार अंत्यसंस्कार


विविध प्रकारचे रोबो बनविण्यात जपानने जगात आघाडी घेतलेली आहे. त्यात हॉटेलमधील वेटरपासून ते कार्यालयीत रिसेप्शनिस्टपर्यंत अनेक प्रकारचे रोबो जपानमध्ये सर्रास वापरले जात आहेत. आता त्यात आणखी एका वेगळ्याच रोबोची भर पडली आहे. जपानच्या निसेई ईकोने अंत्यसंस्कार करणारे बौद्ध रोबो तयार केले आहेत. या रोबोंचे नामकरण पेपर असे केले गेले आहे.

जपानमध्ये जगणेही महाग आहे पण त्यापेक्षाही मरण महाग आहे. यामुळे घरातील कोणी मरण पावले तर दफनासाठी जमीन शोधण्यापासून अंत्यसंस्काराचे विधी करण्यापर्यंत साधारण माणशी ५ लाख रूपये खर्च येतो. मध्यमवर्गीयांना हा खर्च परवडत नाही.निसेई कंपनीचा रोबो अंत्यसंस्काराचे मंत्र म्हणण्यापासून जीजी जबाबदारी अंत्यसंस्कार करणार्‍यांना पार पाडावी लागते ती सर्व पार पाडणार आहेत. या कामासाठी नेहमीच्या लोकांना ६० हजार रूपयांपर्यंत फी द्यावी लागते. रोबो हेच काम ३० हजारांत करणार आहेत.

टोक्योमध्ये आंतरराष्ट्रीय फ्यूनरल व सिमेट्री शो होणार आहे. यात अंत्यसंस्कार सेवा देणारे आपापली माहिती देत असतात यात हे रोबो सादर केले जाणार आहेत. अशा सेवा देणारे १० हजार रोबो जगात कार्यरत आहेत. पेपर हा चार फूट उंचीचा रोबो आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाने युक्त असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment