जगातील सर्वात मोठे सायकल पार्किंग


आज म्हणजे २१ ऑगस्ट रोजी जगातील सर्वात मोठे सायकल अधिकृतरित्या वापरासाठी खुले होत असून हे नेदरलँडमध्ये उभारले गेले आहे. येथे एकावेळी १२५०० सायकली ठेवण्याची व्यवस्था केली गेली आहे. विशेष म्हणजे संपूर्ण देशभर २२ हजार सायकल पार्किंग उभारण्याची योजना येथील सरकारने हाती घेतली आहे.

नेदरलँडमध्ये जगात सर्वाधिक प्रमाणात सायकलचा वापर केला जातो. येथील ७० टक्के जनता कार्यालयात जाण्यासाठी सायकलचा वापर करते. साधारण १० किमी अंतर असेल तर सायकलचा वापर होतो. या देशांत लोकसंख्येपेक्षा अधिक सायकली आहेत. राजधानी अॅमस्टरडॅमची लोकसंख्या आहे ८.१४ लाख व येथे सायकली आहेत १० लाख. देशात ४०० किमीचे सायकल मार्ग बनविले गेले आहेत. यामुळे रस्ते अपघातातील मृत्यूचे प्रमाण लक्षणीयरित्या घटले असल्याचे दिसून आले आहे.

१९५० पासून येथे कारची संख्या वाढत चालली होती मात्र त्यामुळे रस्ते अपघातांचे व त्यात होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणही वाढत चालले होते. १९७१ साली येथे रस्ते अपघातात ३ हजार लोक मरण पावले व त्यात ४५० लहान मुले होती. त्यातून धडा घेऊन येथे कार्सची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी सायकलचा पर्याय स्वीकारला गेला. त्यातच तेल पुरवठादार कंपन्यांनी तेलाचा पुरवठा कमी केल्याचाही परिणाम झाला. मुलांसाठी येथे विशेष सायकली डिझाईन करण्यात आल्या आहेत.

भारताचे पंतप्रधान मोदी यांनी २८ जूनला नेदरलँडला भेट दिली तेव्हा नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रूथ यांनी मोदींना सायकल भेट दिली होती.

Leave a Comment