मुंबई – १.४४ इंच मोनोक्रोम डिस्प्ले आणि ६५० mAhची बॅटरी , सिंगल सिम यासह टॉर्च, फोनबूक, रेडिओ हे बेसिक फिचर्स असणारा जगातील सर्वात स्वस्त बेसिक फोन बाजारात उपलब्ध करण्यात येणार आहे.
आता जगातला सर्वात स्वस्त फोन केवळ २९९ रुपयात
जिओ स्मार्टफोन ग्राहकांना काही दिवसांत उपलब्ध होणार असला तरी आता या स्वस्त स्मार्टफोननंतर सर्वात स्वस्त हा फोन डिटल कंपनी तयार करणार आहे. कंपनीचा दावा आहे की हा फोन ग्राहकांना अवघ्या २९९ रुपयांत उपलब्ध करून देण्यात येईल. सध्या हा फोन ई-डिस्ट्रिब्यूशन साइट बी2बीअड्डा डॉट कॉमवर उपलब्ध आहे. सप्टेंबर महिन्यात बाजारात हा फोन उपलब्ध होणार असून डिसेंबरपर्यंत १० लाख फोन विक्रीचे उद्दिष्ट कंपनीने ठेवली आहे. ज्या लोकांकडे अद्याप फोन नाही किंवा जे लोक स्मार्टफोन घेऊ शकत नाही त्यांच्यासाठी हा फोन असल्याचे कंपनीने म्हटले आहे. देशातील ४० कोटी लोकांकडे आजही फोन नाहीत, त्यांच्यासाठी हा फोन उपयुक्त ठरेल असा दावाही कंपनीने केला आहे.