मार्क झुकेरबर्गकडे पुन्हा पाळणा हलणार, घेणार पितृत्व रजा


फेसबुकचा संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग याच्या घरी परत पाळणा हलणार आहे आणि या वेळेस त्याच्याकडे छोटीसी परी येणार आहे. त्यामुळे त्याने पुन्हा पितृत्व रजेसाठी अर्ज केला आहे.

झुकेरबर्गने शुक्रवारी रात्री उशिरा फेसबुकवरच आपला हा मनोदय व्यक्त केला. झुकेरबर्गची पहिली मुलगी मॅक्सचा जन्म झाला होता, तेव्हाही त्याने दोन महिन्यांची पितृत्व रजा घेतली होती, अशी माहितीही त्याने दिली.

“मी त्यांच्या आरंभीच्या काही महिन्यांमध्ये त्यांच्यासह राहू शकलो, तर ते चांगले होईल. आमची दुसरी मुलगी लवकरच येणार आहे. मी पुन्हा दोन महिन्यांच्या रजेसाठी अर्ज करणार आहे,” असे झुकेरबर्गने म्हटले आहे.

पत्नी प्रिसिला आणि मुलींसोबत राहण्यासाठी आधी एक महिन्याची रजा घेणार असून त्यानंतर डिसेंबर महिन्यातही त्यांच्यासोबत काढणार असल्याची योजना झुकेरबर्गने स्पष्ट केली आहे.

“फेसबुकमध्ये आम्ही चार महिन्यांची मातृत्व आणि पितृत्व रजा उपलब्ध करून देतो. संशोधनातून समोर आले आहे, की नोकरी करणारे कुटुंबीय नवजात बालकांसोबत राहतात, तेव्हा ते संपूर्ण कुटुंबासाठी चांगले ठरते. मी परत येईन तेव्हा संपूर्ण ऑफिस माझ्यासोबत असेल, अशी मला आशा आहे,” असे त्याने लिहिले आहे.

Leave a Comment