गुगल सोमवारी सादर करणार अँड्रॉईड ओ


गुगल कंपनी अँड्रॉईडची सर्वात नवीन आवृत्ती सोमवारी, 21 ऑगस्ट रोजी सादर करणार असून ‘ओ’ असे नाव या आवृत्तीला देण्यात आले आहे. बहुतांश स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टिम असलेल्या अँड्रॉईडची ही आठवी आवृत्ती आहे.

या नव्या प्रणालीत अनेक सुपर पॉवर असतील असा दावा गुगलने केला आहे. भारतीय वेळेनुसार सुमारे 12 वाजता ही आवृत्ती सादर करण्यात येईल. याच दिवशी 1918 नंतर म्हणजे सुमारे 100 वर्षांनंतर अमेरिकेत पहिल्यांदा ऐतिहासिक सूर्यग्रहण होणार आहे. या सूर्यग्रहणासोबत ‘ओ’ धरतीवर येईल आणि त्यात काही सुपर पॉवर असतील, असे गुगलने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

अँड्रॉईडच्या या आवृत्तीची बीटा आवृत्ती यापूर्वी सादर करण्यात आली होती, मात्र आता ती प्रत्यक्षात सादर होणार आहे. सुरूवातीला ही प्रणाली केवळ गूगल पिक्सल आणि नेक्सस स्मार्टफोनमध्ये उपलब्ध असेल. त्यानंतर ती अन्य अँड्रॉईड स्मार्टफोनमध्येही उपलब्ध होईल.

गुगलने 9 फेब्रुवारी 2011 रोजी जिंजरब्रेड ही अँड्रॉईडची पहिली आवृत्ती आणली होती.

Leave a Comment