नवी दिल्ली : फ्लिपकार्टवर स्मार्टफोन बनविणा-या असुस कंपनीने एक धमाकेदार ऑफर सादर केली असून गुरुवारी असुसने ड्युअल रिअर कॅमेरा असलेला ‘झेनफोन झूम एस’ हा स्मार्टफोन लाँच केला आहे. केवळ फ्लिपकार्टवरुन हा फोन खरेदी करता येणार आहे.
‘झेनफोन झूम एस’ तब्बल १५,६०० रुपयांपर्यंतची सूट
या स्मार्टफोन खरेदी करणा-यांना फ्लिपकार्टवर एक्सचेंज आणि नो कॉस्ट ईएमआयची ऑफर उपलब्ध करुन दिली आहे. या स्मार्टफोनवर १५,६०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. म्हणजेच जुना फोन बदली केल्यास १५,६०० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. तुमच्या जुन्या फोनची किंमत किती मिळेल याची माहिती फ्लिपकार्टच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला पूर्ण एक्सचेंज ऑफर मिळाली तर तुम्ही हा फोन केवळ ११,३९९ रुपयांत खरेदी करु शकाल.
त्याचबरोबर या स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमआयची ऑफरसुद्धा उपलब्ध असल्यामुळे हा फोन ४,५०० रुपये प्रति महिन्याच्या सहा आणि ९,००० रुपयांच्या तीन ईएमआयवर खरेदी करु शकता. ईएमआयवर फोन खरेदी करण्यासाठी पेमेंट क्रेडिट कार्डने करावे लागणार आहे.