कॉल ड्रॉप केल्यास १० लाख रुपयांचा दंड


नवी दिल्ली : कॉल ड्रॉपसारख्या समस्यांचा मोबाईल ग्राहकांना अनेकदा सामना करावा लागतो. पण या प्रकरणी आता ट्रायने महत्वपूर्ण निर्णय घेतला असून ट्रायने कॉल ड्रॉपचे प्रमाण रोखण्यासाठी कठोर आदेश दिले आहेत.

ट्रायने दिलेल्या आदेशानुसार, दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनीकडून कॉल ड्रॉप रोखण्यासाठीच्या नियमांचा लागोपाठ ३ महिने भंग झाल्यास १० लाख रुपयांचा दंड आकारण्यात येईल. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) चे अध्यक्ष आर. एस. शर्मा यांनी सांगितले की, आम्ही कॉल ड्रॉप प्रकरणात १ ते ५ लाख एवढा दंड आकारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. त्यानुसार दंड ठोठावण्यात येईल.

ट्रायचे सचिव एस. के. गुप्ता यांनी म्हटले की, दूरसंचार सेवा पुरवणारी एखाद्या कंपनीस जर सलगच्या तिमाहींमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अपयश आले तर दंडाच्या रकमेत दीडपटीने वाढ करण्यात येईल. तसेच जर लागोपाठ तीन महिन्यांमध्ये कॉल ड्रॉप रोखण्यात अयशस्वी ठरल्यास दंडाची रक्कम तिस-या महिन्यात दुपटीने वाढेल.

यासोबतच दूरसंचार सर्कलमध्ये एकूण कालावधीच्या ९० टक्के काळात, ९० टक्के मोबाइल नेटवर्क, ९८ टक्के कॉल्स सुरळीतपणे होणे आवश्यक आहे. म्हणजे एकूण कॉल्सपैकी दोन टक्क्यांहून अधिक कॉल्स ड्रॉप झाल्यास कंपनीकडून दंड आकारला जाऊ शकतो.

Leave a Comment