बीएसएनएलची मोबिक्विकसह युजर्स साठी ई वॉलेट सेवा


सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने शुक्रवारी मोबिक्विक सह वन टॅप बिल पेमेंट सेवा सुरू केली असून त्याचा फायदा किमान १ कोटी ग्राहकांना होणार आहे. या सेवेच्या माध्यमामुळे डिजिटल सेवेचा वापर देशातील १० ते १५ लाख व्यापार्‍यांबरोबर व्यवहार करण्यासाठी होऊ शकणार आहे.मोबिक्विकने बनविलेले हे ई वॉलेट निमशहरी तसेच गामीण भारतात डिजिटल इंडिया मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास टेलिकॉम मंत्री मनोज सिन्हा यांनी व्यक्त केला आहे.

सिन्हा म्हणाले, या सेवेच्या माध्यमातून युजर ऑनलाईन बिले भरणे, बस ट्रेनची तिकीटे खरेदी व अन्य आवश्यक खरेदी करू शकणार आहेत. या कोब्रँडेड वॉलेटमुळे युजरना त्यांची देणीघेणी सुलभ पद्धतीने करता येतील तसेच त्याचा फायदा निमशहरी व ग्रामीण भागातील आर्थिक सेवा मजबूत बनण्यासाठी होऊ शकणार आहे.

भारत संचार निगमचे अध्यक्ष अनुपम श्रीवास्तव म्हणाले या सेवेचा फायदा बीएसएनएलच्या १० कोटी ग्राहकांना मिळू शकेल ते मोबाईलच्या माध्यमातून त्यांची पेमेंट करू शकतील. मोबिक्विक बीएसएनएल भागीदारी लोकांना खात्रीशीर इंटरनेट कनेक्टीव्हीटी व डिजिटल पेमेंटस साठी उपयुक्त ठरेल. ही सेवा स्मार्टफोन व फिचर फोनवर मिळू शकणार आहे.

Leave a Comment