जन्मठेप १४ वर्षांसाठी कशी?


आपण जन्मठेप म्हणजे चौदा वर्षांचा कारावास असे मानतो. चित्रपटातून तर अनेक वेळा जन्मठेपेचा कैदी १४ वर्षांनंतर तुरूंगातून बाहेर आलेला दाखविला जातो. मात्र प्रत्यक्षात जन्मठेप याचा अर्थ आजीवन म्हणजे जीव आहे तो पर्यंत कारावास असा आहे. सुप्रीम कोर्टानेही २०१२ साली जन्मठेप म्हणजे आयुष्यभर कैद असे स्पष्ट केले आहे तरीही जन्मठेप म्हणजे १४ वर्षांची शिक्षा हे समीकरण रूढ झाले आहे. त्यामागे काय कारणे आहेत याची ही माहिती.

आपल्या कायद्यानुसार ज्या गुन्हेगाराला जन्मठेप सुनावली जाते, त्याला कोणत्याही कारणास्तव १४ वर्षांच्या आत शिक्षा संपवून तुरूंगाबाहेर येता येत नाही. म्हणजे जन्मठेप ही किमान १४ वर्षे भोगावी लागते. शिक्षा करण्याचा अधिकार जरी न्यायालयाचा असला तरी ती अमलात आणण्याचे अधिकार व जबाबदारी राज्यशासनांची असते. त्यामुळे ही शिक्षा १४ वर्षांपासून ते कितीही वर्षांपर्यंत असू शकते. कायद्यातील कलम ४३३ अ नुसार कोणाही गुन्हेगाराची ही शिक्षा कमी करण्याचे अधिकार राज्य सरकारांना आहेत. कैदी ही राज्य शासनाची जबाबदारी असते व कशा परिस्थितीत किती वर्षे गुन्हेगाराला ठेवायचे याचा निर्णय सरकार घेऊ शकते. चांगली वर्तणूक, आजार,कौटुंबिक प्रश्न अशा परिस्थितीत सरकार १४ वर्षांनंतर गुन्हेगाराला तुरूंगाबाहेर सोडू शकते.

अनेक वेळा तुरूंगात कैद्यांची संख्या जास्त असली तरी कांही वेळा सरकार सणउत्सवाचे निमित्त साधून शिक्षेत सूट देते. अर्थात सुप्रीम कोर्टाने अशा सणाउत्सवाच्या निमित्ताने शिक्षेत दिली जाणारी सूट मोठ्या संख्येने देण्यावरही बंदी घातली आहे.

Leave a Comment