आईनस्टाईनपेक्षाही जास्त आहे भारतीय मुलाचा आयक्यू


नवी दिल्ली – आईनस्टाईन आणि हॉकिंग्सपेक्षाही १२ वर्षांचा हा भारतीय वंशाचा मुलगा हुशार आहे! त्याचा आयक्यू १६२ असून एका त्याने त्याच्या हुशारीची चुणूक ब्रिटीश रिअॅलिटी स्पर्धेतून दाखवली आहे. त्याला युकेच्या ‘चाईल्ड जिनियस’ या स्पर्धेत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देत त्याने सर्वांनाच चकीत केले. तो या शोमध्ये इतर २० स्पर्धकांना कडवी टक्कर देत आहे. या हुशार विद्यार्थ्याचे नाव राहुल असे आहे.

८ ते १२ वयोगातील विद्यार्थ्यांसाठी हा शो आहे. त्याने केलेल्या कामगिरीचे सोशल मीडियातून खूपच कौतुक होत आहे. तो या शोनंतर रातोराच हिरो झाला आहे. तो स्पेलिंग टेस्टमध्ये अव्वल आला असून त्याने मेमरी टेस्टमध्येही त्याच्याबरोबरच्या सर्व मुलांना मागे टाकले आहे.

राहुल स्वतः खूपच आत्मविश्वासू असून त्याने एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे, होय मी जिनियस आहे. मी नेहमीच सर्वोत्कृष्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. मी गणितात आणि गोष्टी लक्षात ठेवण्यात हुशार असल्याचे त्याने म्हटले आहे. अल्बर्ट आईनस्टाईन आणि स्टिफन हॉकिंग्स इतका राहुल हुशार असल्याचे आयटी मॅनेजर असलेल्या त्याच्या वडिलांनी मिनिष यांनी म्हटले आहे. आठवड्याच्या शेवटी या शोचा फिनाले होणार असून यावेळी युकेच्या चाईल्ड जिनियसचा सन्मान केला जाणार आहे.