जाणून घ्या व्हायरल झालेल्या ‘त्या’ फोटोमागचे सत्य !


यावेळेच्या स्वांतत्र्यदिनी सगळ्याच सोशल नेटवर्किंग साईट्सवर एक फोटो जबरदस्त व्हायरल झाला होता. या फोटोने नुसती भारतीयांचीचं नाहीतर परदेशी नागरिकांची मने जिंकली होती. हा फोटो लाखोच्या संख्येने शेअर केला आणि तेवढ्याच प्रमाणात त्याच्यावर प्रतिक्रिया देखील आल्या. तो फोटो होता आसाममधील एका शाळेचा. आसाममध्ये त्यावेळी असलेली पूरस्थिती तुम्हाला नव्याने सांगायला नको. तेथे आलेल्या पुरामुळे तेथील जनजीवन अस्तव्यस्त झाले. तेथील लोकांचे रहाण्याचे सोडा पण खाण्याचे देखील वांदे झाले होते. त्याच दरम्यान देशाचा राष्ट्रीय सण म्हणजे १५ ऑगस्ट देखील येऊन ठेपला होता. याच दरम्यान येथील शाळेतील काही मोजक्या विद्यार्थ्यांनी आणि एका शिक्षकाने केलेले ध्वजारोहण अविस्मरणीय ठरले.

पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल हा फोटो नेमका कोणत्या कारणामुळे सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. पण आम्ही त्यामागचे सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि व्हायरल फोटोमागील सत्य जाणून घेतले. त्याचे झाले असे आसाममधील धुबरी येथील नशकारा प्राथमिक शाळेत हे ध्वजारोहण करण्यात आले. पण आपल्या देशातील शालेय शिक्षण विभागाच्या नियमानुसार सरकारी शाळेत कुठलाही राष्ट्रीय सण साजरा केला तर पुरावा म्हणून त्याचा फोटो या विभागाकडे पाठवणे अनिवार्य आहे. त्याच नियमानुसार या शाळेत सहायक शिक्षक म्हणून काम करणाऱ्या मिझानूर रेहमान यांनी हा फोटो फेसबुकवर पोस्ट केला.

Leave a Comment