कार्पोरेट देणग्यात भाजप आघाडीवर


असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफार्म म्हणजे एडीआरने नुकत्याच केलेल्या एका सर्वेक्षणात राजकीय पक्षांना दिल्या जाणार्‍या कार्पोरेट देणग्यांमध्ये चांगलीच वाढ झाली असल्याचे दिसून आले असून यात भाजप आघाडीवर आहे तर त्याखालोखाल काँग्रेसचा नंबर असल्याचे स्पष्ट झाले आहे. एडीआर ने गेल्या चार वर्षांत सर्वच राजकीय पक्षांना मिळालेल्या देणग्यांचे विश्लेषण केले असून या काळात राजकीय पक्षांना एकूण ९५६.७७ कोटींच्या देगण्या मिळाल्या असल्याचे दिसून आले आहे.

या एकूण देणग्यात ८९ टक्के देणग्या कार्पोरेट घराण्यांकडून आल्या आहेत. नियमानुसार देणग्यांची माहिती निवडणूक आयोगाला देणे सर्व राजकीय पक्षांवर बंधनकारक आहे. त्यानुसार भाजपला २९८७ कार्पोरेट डोनर्सकडून ७०५.८० कोटी रूपयांच्या देणग्या मिळाल्या आहेत तर काँग्रेसला १६७ डोनर्सकडून १९८.१६ कोटी रूपये मिळाले आहेत. सत्या ट्रस्टने सर्वाधिक म्हणजे २६०.८७ कोटींच्या देगण्या दिल्या आहेत. सेक्टर क्षेत्रात रियर इस्टेट सेक्टरकडून १६.९५ कोटींच्या देणग्या दिल्या गेल्या आहेत. त्यात भाजपला १५.९६ कोटी रूपये मिळाले आहेत. १९३३ देणगीदारांनी दिलेल्या ३८४ कोटींच्या देणग्यात पॅन नंबर दिले गेलेले नाहीत असेही दिसून आले आहे.

Leave a Comment