नेटिझनची एक हात नसलेल्या मुलीला पसंती


प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी कमी असतेच. सर्वच जण परिपूर्ण असु शकत नाही. पण आयुष्यातील युद्ध तोच जिंकू शकतो जो आपल्या कमजोरीलाच आपली शक्ती बनवू शकतो. अशीच कहाणी आहे एकवीस वर्षीय लॅारेन हीची.

गेल्या वर्षी लॅारेनला एका अपघातात आपला हात गमावला लागला. या दुर्घटनेनंतरही तीने आपल्या चेहऱ्यावरील हास्य आणि जिंदादिली टिकविली आहे.

आपल्या हजरजवाबाने ती इंटरनेटवर नेटिझनमध्ये खूप प्रसिद्ध आहे. आपल्या विनोदबुद्धीमुळेच मी माझ्या कमजोरीवर विजय मिळवू शकते, असे ती म्हणते. ती हसत म्हणते की मी कधीही टाळी वाजविणारी इमोजी वापरत नाही. कारण मी टाळी वाजवू शकत नाही.

तिला पहिल्यांदा आपल्या कापलेल्या हातावर हसणे कठिण वाटत होते. पण तिने जेव्हा या हातावर पश्चाताप करणे सोडून दिले. त्यानंतर तिचं आयुष्यच बदलून गेले.

लॅारने आता टविटरवर एकापेक्षा अधिक सुंदर मजेदार टवीट करते. इंस्टाग्रामवर आपले सुंदर फोटोही ती शेअर करते. लॅारेनने डेटिंग साइट टिंडर वर आपले प्रोफाइल बनविले आहे. त्यामुळे तिच्या प्रेमात अनेक जण पडले असून तिच्याशी विवाह करण्यासाठी अनेकांनी पसंती दर्शविली आहे.

टिंडर प्रोफाइलवर तिने आपल्या व्यक्तीमत्वाला दहा पैकी वीस गुण दिले आहे, तर चेहऱ्याला दहा पैकी दहा, शरीराला दहा पैकी नऊ तर हातांना दोन पैकी एक असे गुण दिले आहे. लॅारेनच्या या प्रोफाइला जगभरातून पसंती मिळत आहे. इतकेच नाही तर तिच्या सकारात्मक जगण्यातून अनेक जण प्रेरणा घेत आहे.

Leave a Comment