नोकियाचा बहुप्रतिक्षित नोकिया ८ अखेर बाजारात दाखल


सध्या मोबाईल उत्पादक कंपन्यांमध्ये जोरदार स्पर्धा सुरु असून ग्राहकांच्या त्यातील फीचर्सवरुन विशिष्ट कंपनीच्या फोनवर उड्या पडत आहेत. बाजारात नव्याने दाखल झालेल्या नोकिया ८ या फोनमध्ये दोन्ही बाजूने फोटो काढता येणार आहे तसेच व्हिडिओ शूटींग करता येणार आहे. फोनमधील ऑडिओ आणि व्हिडिओची गुणवत्ता ग्राहकांच्या मागणीनुसार वाढविण्यात आली आहे. कॅमेरा मेकर ZEISS ची लेन्स यामध्ये वापरण्यात आली आहे. यामुळे तुम्ही एकावेळी दोन्ही बाजूचा कॅमेरा वापरुन व्हिडिओ काढू शकणार आहात.

नोकिया बाजारातील इतर कंपन्यांना या नव्या फिचरमुळे चांगलीच टक्कर देणार आहेत. यामध्ये सॅमसंगला जास्त फटका बसणार आहे. नोकिया ८ कॅमेराचा दोन्ही बाजूचा कॅमेरा १३ मेगापिक्सेल असल्याने या व्हिडिओची क्षमताही चांगली असेल. क्वॉल्कॉमचा लेटेस्ट प्रोसेसर स्नॅपड्रॅगन ८३५ देण्यात आला आबे. ४ जीबी रॅमबरोबरच ६४ जीबीची इंटरनल मेमरी यामध्ये आहे. ही मेमरी २५६ जीबीपर्यंत वाढविण्यात येऊ शकते.

Leave a Comment