आत्महत्येला प्रोत्साहन देणार्‍या २३ हजार साईट लोकेट


रशियातील सुरक्षा वॉच डॉग म्हणून ओळखल्या जाणार्‍या रोस्पोट्रोबनादत्झोर ने गेल्या पाच वर्षात २३ हजारांहून अधिक वेवसाईटची ओळख पटविण्यात यश मिळविले असून या सर्व साईट आत्महत्त्येला प्रोत्साहन देणे, आत्महत्त्या कशी करावी याची माहिती देणार्‍या असल्याचा दावा केला आहे. १ नोव्हेंबर २०१२ पासून अशा २५ हजार साईट तपासल्या गेल्या त्यातील २३७०० साईटवर या प्रकारचा मजकूर असल्याचे दिसून आले आहे.

आजकाल किशेारवयीन मुले तसेच लहान मुलांत ऑनलाईनवर आत्त्महत्या संदर्भातील वेबसाईट पाहण्याच्या प्रमाणात प्रचंड वाढ होताना दिसून येत आहे. कांही समुह, समुदाय ही माहिती वेबसाईटवरून देत आहेत. त्यांची माहिती मिळवता यावी यासाठी रशियाने कायद्यात बदल केला असून रोस्टेट या आकडेवारी देणार्‍या संस्थेच्या म्हणण्यानुसार आत्महत्त्या हा सामाजिक मुद्दा बनला आहे. त्यावर उपाय शोधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे.

Leave a Comment