नवी दिल्ली : केंद्र सरकारने सर्व सोशल मीडिया साइट्सना जगभरात धुमाकूळ घालणाºया जीवघेण्या ब्ल्यू व्हेल चॅलेंज गेमबाबतच्या सर्व लिंक तातडीने काढून टाकण्याचे आदेश दिले असून या गेमची किंवा त्यासंबंधित असलेली लिंक इंटरनेट प्लॅटफॉर्मवरून तातडीने हटवावी, असे पत्र इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने गुगल, फेसबुक, व्हॉट्सअॅप आणि याहू यासारख्या वेबसाइट्सना पाठविले आहे.
सरकारने दिले ब्ल्यू व्हेल चॅलेंजच्या सर्व लिंक काढण्याचे आदेश
भारतात अनेक ठिकाणी मुलांनी ब्ल्यू व्हेल चॅलेंजमुळे आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या आहेत. मुंबई आणि पश्चिम बंगालमध्येही अशा घटना काही दिवसांपूर्वी घडल्यामुळे या गेमवर बंदी घालण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरत होती.
ब्ल्यू व्हेल चॅलेंज हे २०१३ साली रशियात फिलिप ब्यूडेइकिन व त्याच्या साथीदारांनी डेव्हलप केले. ब्ल्यू व्हेल म्हणजे एक वेगवेगळे टास्क देणारा अॅडमिनिस्ट्रेटर आहे. ऑर्डर देणारी व्यक्ती अज्ञात असते. एकदा या खेळात लॉग इन केले की तो वेगवेगळे चॅलेंज देतो. साधारणत: ५० टप्पे ओलांडावे लागतात. या टप्प्याची प्रगती सोप्यापासून अवघड लेव्हलच्या दिशेने होते. शेवटी खेळणाºयाला आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते.