घरगुती सोप्या उपचारांनी अंगदुखीला करा बायबाय


दिवसभराच्या ताणतणावपूर्ण कामांमुळे अनेकांना अंगदुखी वा शरीराच्या कांही भागात वेदना होण्याचा त्रास होतो. अशा वेदनांमुळे आरोग्याच्या समस्याही निर्माण होऊ शकतात. त्यामुळे त्यावर वेळीच उपचार करणे गरजेचे असते. वेदनाशामक औषधे वारंवार घेण्याचे दुष्परिणाम होतात. त्यामुळे अंगदुखीवर वेदनाशामक औषधांचा वापर करण्याऐवजी आयुर्वेदात सांगितलेले काही घरगुती उपाय खूपच परिणामकारक ठरतात. कोणते आहेत हे उपाय त्याची ही माहिती

शरीरात कुठेही वेदना होत असतील तरी लवंग व काळी मिरी यांचा चांगला उपयोग होतो. चहा करताना त्यात पाच लवंगा व थोडी मिरी घालून व आले घालून केलेला चहा गरमगरम प्यायलाने खूप आराम वाटतो. तसेच घसा दुखत असेल अथवा अंग दुखत असेल तर अर्धा चमचा हळद १ ग्लासभर दुधातून गरम असताना प्यायलानेही खूप फायदा होतो.


दोन चमचे मोहरीचे तेल त्यात लसणाच्या पाच पाकळ्या टाकून गरम करावे व या तेलाचा मसाज तेल गरम असताना कापडाच्या बोळ्यावर घेऊन जेथे दुखते त्या जागी केल्यानेही वेदना कमी होतात. आल्याचे साल काढून ते गरम करावे व कॉटनच्या कापडात बांधून जेथे वेदना होत असतील तेथे त्याचा १० मिनिटे शेक घ्यावा.


दालचिनी व मध १-१ चमचा कोमट पाण्यात घालून त्याचा मसाज दुखर्‍या भागावर केल्यानेही आराम मिळतो. तसेच निलगिरी व आल्याची पेस्ट कॉटन कपड्यात बांधून त्याचा शशे घेतल्यासही बरे वाटते. गरम पाण्यात मीठ घालून टॉवेल भिजवून शेक घेणेही खूपच फायद्याचे ठरते. या उपचाराने अंगावर कोठे सूज आली असेल तर तीही कमी होते. विशेषतः पाय दुखत असतील तर हा उपचार खूपच सोपा व परिणामकारक ठरतो.

Leave a Comment