पाहताच प्रेमात पाडेल कस्टमाईज्ड यामाहा आरडी ४००


अमेरिकन मोटरसायकल रेसर व आयकॉनिक डिझायनर रोलान्ड सँडस याने १९७४ सालची यामहा आर डी ४०० अशा प्रकारे कस्टमाईज केली आहे की कोणताही बाईक प्रेमी तिच्या प्रेमातच पडला पाहिजे.४३ वर्षीय रोलान्ड ने यामाहाला फिटनेस, फिनिश व डिटेलिंग संदर्भात एकमद परफेक्ट बनविले आहे. या बाईकची बांधणी, रंग, फॅब्रिकेशन व क्वालिटी इतकी अलग आहे की त्यामुळेच तिला युनिक कस्टमाईज्ड बाईक म्हटले जात आहे.

रोलान्ड कडे त्याची डिझायनर टीम आहे मात्र ही बाईक त्याने स्वतःच कस्टमाईज केली आहे. या बाईकचे फॅब्रिकेशनचे बरेचसे काम त्याने स्वतः केले आहे.ते करताना त्याने स्वतःजवळच्या विंटेज मॉडेल्सचे पार्टस एकत्र केले आहेत. यामाहा १९७४ आरडी ४०० ला ३९९ सीसीचे टू स्ट्रोक ट्वीन इंजिन रोलान्डोने त्याच्या पद्धतीने कस्टमाईज केले आहे. त्यासाठी त्याने यामाहा टी जे २५० ची १९९७ ची चासी वापरली आहे. कारण त्याच्या मते ही यामाहाची सर्वात उत्तम चासी आहे. बाईकचे वजन कमी करण्यासाठी कार्बन फायबरचा वापर केला गेला असून बाईकला सिक्स स्पीड ड्राय क्लच कीट आहे. सिल्व्हर लीफपेंट मध्ये बाईकचे नांव चायनीज कॅरेक्टरमध्ये लिहिले गेले आहे. ही बाईक तयार करतानाचा व्हिडीओही प्रसारित केला गेला आहे.