१५ ऑगस्टपासून भारतीय बाजारपेठेत नोकियाच्या बहुप्रतिक्षित अशा स्मार्टफोनपैकी एक असलेला ‘नोकिया’ ५ हा स्मार्टफोन विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. नोकियाचे तिन्ही स्मार्टफोन जूनमध्ये भारतीय बाजारपेठेत लाँच करण्यात आले होते. त्यानंतर या फोनची जुलैपासून ऑनलाइन बुकिंग सुरू झाली. ई-कॉमर्स साईटवर हे फोन आधी उपलब्ध होते पण आता ग्राहकांना १५ ऑगस्टपासून हे फोन जवळच्या मोबाईल स्टोअरमध्ये विकत घेता येणार आहे.
१५ ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध होणार नोकिया ५
या संदर्भातील माहिती एचएमडी ग्लोबलने दिली आहे. १२,४९९ रुपये ऐवढी या फोनची किंमत असणार आहे. हा फोन चार रंगात उपलब्ध असणार आहे. मॅट ब्लॅक, सिल्व्हर, टेम्परर्ड ब्लू, कॉपर अशा चार रंगात हे फोन ग्राहकांसाठी उपलब्ध असतील. पण सध्या बाजारात मात्र मॅट ब्लक रंगाचाच हँडसेट उपलब्ध असणार आहे. उर्वरित तीन रंगासाठी मात्र ग्राहकांना वाट पाहावी लागणार आहे.