नोटबंदी फायद्याची होती का तोट्याची ?


नव्या चलनावर १३ हजार कोटींचा खर्च ;१० रुपयांचे एक नाणे पडले ६ रुपयांना !
नवी दिल्ली – नोटबंदी फायद्याची होती का तोट्याची ? हा मुद्दा आगामी काळात पुन्हा गाजणार अशी चिन्हे असली तरी नोटबंदीनंतर नवे चलन छपाईसाठी रिझर्व्ह बँकेला १३ हजार कोटींचा खर्च करावा लागला आहे. एसबीआयच्या अहवालातून ही बाब स्पष्ट झाली असली तरी १० रुपयांच्या एका नव्या नाण्याच्या निर्मितीवर सहा रुपयांचा खर्च होत असल्याची वस्तुस्थिती यानिमित्ताने उघडकीस आली आहे.

नव्या चलनाच्या छपाईवर आरबीआयने आतापर्यंत 12 ते 13 हजार कोटींचा खर्च केला आहे. आता आरबीआय 200 रुपयांची नोटही छापत आहे. यामुळे 500च्या नोटेसोबत 200 रुपयांचीही नोट जर छापली तर हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता आहे.नोटबंदीनंतर २००० हजार आणि ५०० रुपयांच्या नवीन चालण्यासाठी एका नोट मागे २ रुपये ८७ पैशापासून ३ रुपये ७७ पैशांपर्यंत खर्च हा निर्मितीसाठी आला आहे. त्यात २००० रुपयांच्या नोटांसाठी [ चलन ] ८३० कोटी तर ५०० रुपयांच्या नोटांसाठी [ चलन ] ३ हजार ९८० कोटी रुपयांच्या खर्च झाला आहे.एसबीआयच्या रिपोर्टनुसार, नोटबंदीच्या वेळी 15.44 लाख कोटी रुपये किमतीचे चलन परत आले आहे. यापैकी आतापर्यंत 84% चलन परत अर्थव्यवस्थेत आले आहे. विशेष म्हणजे कागदी चलनाच्या निर्मितीवर होणारा खर्च पाहता धातूपासून बनविलेले नाणे मात्र खर्चिक ठरत असल्याची बाबही यानिमित्ताने प्रकाशझोतात आली आहे. १० रुपयांच्या नव्या एका नाण्यासाठी आरबीआयला सहा रुपयांचा खर्च येत आला. चलन कोणतेही असू द्या , वाहतुकीवरही मोठा खर्च होत असल्याची वस्तुस्थिती असून त्यात नाण्यांवरील वाहतुकीचा खर्च हा सुमारे १५०० कोटी रुपये असल्याचेही एसबीआयच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे.

Leave a Comment