बेनेल्ली झार्फिनो २५० स्कूटर भारतात येणार


इटलियन मोटरसायकल मेकर बेनेली व डीएसके मोटोव्हिल्स यांच्यातील परस्पर सहकार्य करार व व्यवसाय २०१६ पासून सुरू झाला असून भारतात बेनेलीची युनिक लूकची बेनेली डीएसके झार्फिनो २५० स्कूटर हायएंड स्कूटर सेगमेंटमध्ये दाखल होत आहे. भारतात या स्कूटरची किंमत जाहीर केली गेलेली नसली तरी ती १० लाख रूपयांपर्यंत असेल असे सांगितले जात आहे. अर्थात २५० सीसी स्कूटरला भारतात अद्यापी तरी खूप स्पर्धा नाही. या स्कूटरचे टेस्टींग पुण्यात होत असताना ती स्पॉट झाली असून अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ती ऑगस्ट २०१७ म्हणचे याच महिन्यात भारतात दाखल होणार आहे.

ही स्कूटर अन्य स्कूटरच्या तुलनेत मोठी व वजनदार आहे. तिचे वजन १५५ किलो असून इंधन टाकीची क्षमता १२ लिटरची आहे. तिला २४९.७ सीसीचे सिंगल सिलेंडर इंजिन दिले गेले आहे. इलेक्ट्रीक फ्यूएल इंजिन, व्ही बेल्ट, ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, फ्रंट व्हीलला ड्यूअल डिस्क ब्रेक, अशी तिची अन्य वैशिष्ठे आहेत.

Leave a Comment