सुईच्या नेढ्यातून जाणारा सोन्याचा तिरंगा वल्ड रेकॉर्डसाठी सज्ज


सूक्ष्म वस्तू बनविण्यात अलौकिक कौशल्य प्राप्त केलेले उदयपूर येथील कसबी कलाकार इक्बाल यांनी देशाच्या ७० व्या स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून आणखी एका गिनीज रेकॉर्डसाठी प्रयत्न केला आहे. इक्बाल यांनी सुईच्या नेढ्यातून सहज जाऊ शकेल असा सोन्याचा तिरंगा तयार केला असून हा जगातील सर्वात छोटा झेंडा असल्याचा दावा केला आहे. या झेंडयाची नोंद गिनीज बुकमध्ये व्हावी यासाठी त्यांनी अर्ज केला आहे. यापूर्वी जगातला सर्वात छोटा झेंडा बनविण्याचे रेकॉर्ड कॅनडाच्या नावावर आहे.

इक्बाल यांनी बनविलेला तिरंगा ०.५ मिमी आकाराचा आहे व १२ नंबरच्या सुईच्या नेढ्यातून तो सहज पार होतो. हा ध्वज भारत सरकाराच्या राष्ट*ीय संग्रहालयात ठेवला जावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यासाठी अनुमती मिळावी म्हणून त्यांनी राष्ट*पती रामनाथ कोविद यांना पत्र लिहिले असल्याचे समजते. इक्बाल यांच्या नावावर या पूर्वी ५२ रेकॉर्ड आहेत. १९९१ साली त्यांनी सर्वात कमी वजनाची सोनसाखळी बनविली होती. २००४ साली त्यांनी बनविलेली सर्वात छोटी चहाची किटलीही गिनीज बुक मध्ये नेांदविली गेली आहे. तर २००९ मध्ये जगातील सर्वात छोटा शिक्काही त्यांच्या नावावर गिनीज बुकमध्ये नोंदविला गेला आहे.इक्बाल यांनी बनविलेल्या अशा ५२ वस्तू गिनीज, लिम्मा, युनिक वर्ल्ड रेकॉर्ड,इंडिया बुक, वर्ल्ड अमेरिकन रेकॉर्ड, एशिया बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये नोंदविल्या गेल्या आहेत.