Skip links

गोरखपूर रुग्णालयातील घटना हा अपघात नाही तर हत्याच आहे – कैलाश सत्यार्थी


गोरखपूर – ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी उत्तर प्रदेशातील गोरखपूर रुग्णालयात आतापर्यंत ६० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.देशभरात या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असतानाच या प्रकाराबाबत नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी चीड व्यक्त केली आहे. हा अपघात नसून हत्याच असल्याचे म्हणत त्यांनी आपला संताप ट्विटरद्वारे व्यक्त केला. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांचा हाच अर्थ आहे का, असा सवालही त्यांनी केला.

अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी योगी आदित्यनाथ यांनी निर्णायक हस्तक्षेप करावा, जेणेकरून दशकभरापासूनची भ्रष्ट आरोग्य व्यवस्था ठिक होईल, अशी अपेक्षाही त्यांनी आपल्या दुसऱ्या ट्विटमध्ये व्यक्त केली.

दरम्यान ऑक्सिजन पुरवठ्याअभावी आतापर्यंत गोरखपूरमधील बाबा राघव दास वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात लहान मुलांसह ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

Web Title: The incident in Gorakhpur hospital is not an accident, but a murder - Kailash Satyarthi