उद्धव ठाकरेंकडून सुभाष देसाईंची पाठराखण


मुंबई : उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाठराखण केली असून सुभाष देसाई हे चांगले काम करत असल्याची पुष्टीही त्यांनी यावेळी जोडली.

इगतपुरी एमआयडीसी जमीन हस्तांतर घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. पण मुख्यमंत्र्यानी त्यांचा राजीनामा फेटाळला आहे. उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर देसाईंची भक्कम पाठराखण केली. राजीनामा देण्याची तयारी देसाईंनी दर्शवल्यानेच मी त्यांना मुख्यमंत्र्यांकडे पाठवले होते. पण मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा माझ्या आणि मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेअंती फेटाळण्याचा निर्णय घेतला असल्याचेही उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच देसाई यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनीच अनेक गंभीर घोटाळे केले आहे. त्यामुळे त्यांचीच चौकशी करण्याची खरी गरज असल्याचा टोलाही उद्धव ठाकरेंनी केला.