Skip links

समृद्धी’बाधित ;पण विरोधातील शेतकऱ्यांना दिलासा


मुंबई – राज्यशासनाचा महत्वपूर्ण प्रकल्प असणाऱ्या ‘समृद्धी’विरोधात शेतकरी मोठ्या प्रमाणावर एकवटल्याने आता सरकारने सावध पवित्रा घेतला आहे. जमिनीचे भूसंपादन करताना जबरदस्ती करणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांचा विरोध आहे,त्यांच्यावर सक्ती लादणार नाही अशी भूमिका घेतली आहे. परिणामी आता समृद्धी’बाधित ;पण विरोधातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

शेतकऱ्यांच्या जमिनी शासन दडपशाहीने घेत असल्याबद्दल नियम १०१ अन्वये काँग्रेसच्या संजय दत्त यांनी लक्षवेधीद्वारे हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यावर समृद्धी महामार्गासाठी जे शेतकरी स्वेच्छेने पुढे येत आहेत ,त्यांच्याच जमिनी घेण्यात येत असून कोणावरही जबरदस्ती करण्यात येत नाही. त्यांच्याशी संवाद साधत, वाटाघाटी करत या जमिनी घेतल्या जात आहेत.

नाशिकच्या इगतपुरी आणि सिन्नर येथील शेतकऱ्यांच्या जमिनी जर जबरदस्तीने घेतल्या जात असतील तर आपण स्वतः अधिकाऱ्यांसोबत त्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष माहिती घेऊ, असे आश्वासन आज सार्वजनिक बांधकाम (उपक्रम)मंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिले आहे . शिंदे यांनी भूसंपादन अधिनियम २०१५ च्या कलम २६ आणि ३०चा पुरेपूर वापर करण्यात येत असल्याचे सांगितले.

Web Title: Samruddhi highway; But relief to farmers opposed