आर कॉमने आणला अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचा नवा प्लॅन


मुंबई – टेलिकॉम क्षेत्रात सध्या मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओमुळे प्रचंड स्पर्धा निर्माण झाली असून सर्वच इतर कंपन्यांनीही जिओ कंपनीला टक्कर देण्यासाठी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन प्लॅन आणले आहेत. या स्पर्धेत आता अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्स कंपनीने उडी घेतली आहे.

२९९ रुपये किंमतीचा नवा प्लॅन रिलायन्स कम्युनिकेशनने आणला आहे. याबद्दल कंपनीने ट्विटरवरुन माहिती दिली आहे. यामध्ये हा टेरिफ प्लॅन सर्वात स्वस्त असल्याचा दावा करण्यात आला आहे. ज्यामध्ये अनलिमिटेड कॉलिंग, डेटा आणि संदेश मिळणार आहे. या प्लॅनची वैधता महिन्याभरासाठी असणार आहे. मात्र, ही ऑफर मिळवण्यासाठी यूजर्सला Eshop.com वर जावे लागणार आहे. त्याठिकाणी तुमच्या नंबरसाठी ही ऑफर आहे का तेही पाहावे लागेल.