प्रसून जोशी सेन्सॉर बोर्डाचे नवे अध्यक्ष


मुंबई : सेन्सॉर बोर्डाचे वादग्रस्त अध्यक्ष पहलाज निहलानी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली असून या पदावर आता प्रसिद्ध गीतकार प्रसून जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच अभिनेत्री विद्या बालनलाही सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

वेगवेगळ्या कारणांनी तब्बल तीन वर्ष सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेले पहलाज निहलानी हे वादात सापडले होते. त्यांच्या विरोधात त्यामुळे अनेक बॉलिवूड अभिनेते उभे ठाकले होते. त्यांच्या अनेक निर्णयांवर जोरदार टीकाही झाली होती. निहलानी यांना पदावरुन हटवण्यासाठी त्यांची आडमुठी भूमिकाही कारणीभूत असल्याचे म्हटले जात आहे. सिनेक्षेत्रातूनही त्यांच्या या भूमिकेमुळे त्यांच्यावर वारंवार टीका सुरु होती.

ऋषी कपूर यांनी डायरेक्टर अनुराग कश्यपला दिलेल्या तिखट प्रतिक्रिया बद्दल रणबीरने व्यक्त केले आपले मत