आता ‘तेजस’मध्ये मिळणार उकडीचे मोदक


मुंबई – ‘आयआरसीटीसी’ने अत्याधुनिक वेगवान तेजस एक्स्प्रेसमध्ये गणेशोत्सव काळात कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना उकडीचे मोदक पुरवण्याचा निर्णय घेतला असून आता गणेशोत्सव काळात ‘तेजस’च्या मेनूमध्ये उकडीचे मोदक उपलब्ध असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबईतील नोकरदार कोकणात मोठय़ा संख्येने रेल्वेने प्रवास करतात. ‘तेजस एक्स्प्रेस’चे बुकिंगही या काळात फुल्ल झाले असून कोकण रेल्वे त्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना मेनू कार्डमध्ये मोदक उपलब्ध करून देऊन कोकणात जाणाऱ्यांचा प्रवास अजून गोड करण्याचा प्रयत्न करणार आहे. तेजस एक्स्प्रेसमध्ये सुरुवातीला पुरवण्यात येणाऱ्या खाण्याच्या मेनूवरून प्रवाशांनी रेल्वे प्रशासन व भारतीय रेल्वे कॅटरिंग सेवेवर टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर आयआरसीटीसीने कोकणातील पदार्थाचा समावेश मेनू कार्डमध्ये केला आहे. तसेच त्यानंतर प्रवाशांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्याबाबतचा प्रस्ताव असून अंतिम निर्णय झाला नाही.