Skip links

आता मी कोणालाच घाबरत नाही – शरद यादव


मुझफ्फरपुर – आपल्याविरोधात कारवाई करण्याची दिलेली धमकी जदयूचे वरिष्ठ नेते शरद यादव यांनी फेटाळून लावली आहे. शरद यादव बिहारमधील महाआघाडी तोडून भाजपाशी हातमिळवणी केल्याने मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर नाराज आहेत. त्यांनी आपली ही नाराजी उघड केली असून, नितीश कुमार यांच्यावर टीकाही केली आहे. दरम्यान जदयूमधील काही नेते शरद यादव यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत असल्याच्या वृत्तावर बोलताना, आपण माजी पंतप्रधान इंदिर गांधींच्या विरोधातही उभे राहिलो होतो, आणि आता कोणालाच घाबरत नाही असे सांगितले आहे.

याबाबत बोलताना जदयूचे संसदीय नेते शरद यादव यांनी म्हटले आहे की, मला घाबरवण्याचा काही नेते प्रयत्न करत आहेत. इंदिरा गांधींचाही मी न घाबरता सामना केला आहे. मग मला घाबरवणारे हे कोण ? शरद यादव यांनी राज्यात नितीश कुमार यांच्या निर्णयाविरोधात आपली नाराजी आणि विरोध लोकांसमोर मांडण्यासाठी संवाद यात्रा काढली असून लोकांशी संवाद साधताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.

आपल्यामध्ये आणि नितीश कुमार यांच्यात पुन्हा सगळे नीट होण्याची कोणतीच शक्यता नसल्याचे शरद यादव यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. नितीश कुमार यांचा भाजपासोबत जाण्याचा निर्णय अयोग्य ठरवत लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप याआधीच शरद यादव यांनी केला आहे.

Web Title: Now I am not afraid of anyone - Sharad Yadav