वयाच्या ९१ व्या वर्षी पदवीधर झाल्या आजीबाई


थायलंडमधील एका ९१ वर्षांच्या एका आजींनी नुकतीच तेथील महाविद्यालयातून पदवी संपादन केली आहे. या आजींबाईंचे नाव किमलान जिनाकू असे असून त्यांनी मानव आणि कुटुंब विकास या विषयात पदवी संपादन केली आहे.

आपल्याला मिळालेल्या पदवीवर आजीबाई म्हणतात की, आपण शिकलोच नाही तर वाचणार कसे आणि ज्ञान आपल्याला कसे मिळणार? ज्ञानच जर आपल्याजवळ नसेल तर चारचौघांत आपण नीट बोलणार कसे? त्यांनी तेव्हा या विषयाचा अभ्यास करण्यासाठी दहा वर्षे मेहनत घेतली. नुकत्याच पार पडलेल्या दीक्षांत सोहळ्यात थायलंडच्या राजांच्या हस्ते त्यांना पदवी प्रदान करण्यात आली. आजींनी वयाच्या ९१व्या वर्षी पदवी संपादन करून एक नवा आदर्श जगासमोर घालून दिला आहे. शिक्षणाला वयाचे बंधन नसते हे आजीबाईंनी जगाला दाखवून दिले आहे.

Leave a Comment