मुख्यमंत्र्यांनी फेटाळला सुभाष देसाईंचा राजीनामा


मुंबई : विरोधकांनी विधीमंडळात उद्योग मंत्री सुभाष देसाईंच्या खात्यात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला ल्यानंतर देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी याच पार्श्वभूमीवर राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुभाष देसाई यांनी राजीनामा सोपवला आहे. पण देसाई यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी फेटाळला आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी एमआयडीसीची ४०० एकर जमीन मूळ मालकाला परत केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता.