लग्नाच्या आठवणीत पुन्हा रमली बिपाशा !


अभिनेत्री बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हर यांचा विवाह खूप धुमधडाक्यात पार पडला होता. त्यांनी त्यानंतर परदेशात जाऊन हनिमुनला देखील खूप मजामस्ती केली. बिपाशाला लग्नाचे ते दोन दिवस फारच कष्टाचे वाटले होते. पण आता ती त्या आठवणीत पुन्हा रमली आहे.

लग्नाचे ते दोन दिवस कष्टाचे होते मात्र त्यातून मिळालेला आनंद फारच वेगळा होता. आता त्यासाठी पुन्हा एकदा लग्न करण्याची तिची तयारी आहे. अर्थात लग्न दुसरे कुणाशी नाही तर नवरा करणसोबत पुन्हा बोहल्यावर चढावे असे तिला वाटते. बिपाशा आणि करण हे जोडपे खूपच एन्जॉय करीत असताना त्यांच्या फोटोतून आपण पाहिले आहे. कामाच्या व्यापातून दोघेही सुट्टी काढतात आणि आवडत्या ठिकाणी सहलीचा आनंद लुटतात. समुद्र किनारा त्यांचे सर्वात आवडते ठिकाण असावे. त्यांनी अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. बिपाशाला एका पुस्तक प्रकाशनाच्यावेळी लग्नाबद्दलचा प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा पुन्हा एकदा करणसोबत लग्न करण्याची इच्छा असल्याचे उत्तर तिने दिले.

पहा बॉलीवूड कलाकारांचे वात्रट आणि मजेशीर बोलणे