शाओमी रेडमी नोट ४ ची विक्रमी विक्री


चीनी स्मार्टफोन कंपनी शाओमीने गेल्या सहा महिन्यात भारतात रेडमी नोट ४ ची तब्बल ५० लाख युनिट विकली असल्याचे जाहीर केले आहे. या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यात कंपनीने सर्वाधिक संख्येने हे हँडसेट भारताला पुरविले असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. रेडमी नोट ४ हा भारतात सर्वाधिक वेगाने विकला गेलेला स्मार्टफोन आहे.

कंपनीच्या म्हणण्यानुसार भारतीय स्मार्टफोन बाजारात रेडमी नोट ४ च्या विक्रीचा हिस्सा ७.२ टक्के इतका आहे. याचाच अर्थ भारतात ऑनलाईन विक्री होणार्‍या दर चार स्मार्टफोनमध्ये एक रेडमी नोट ४ आहे. हा फोन तीन व्हेरिएंटमध्ये लाँच केला गेला आहे. २ जीबी रॅम व ३२ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ९९९९ असून ३ जीबी ३२ जीबी स्टोरेज १०९९९ व ४ जीबी ६४ जीबी स्टोरेजसाठी १२९९९ रूपये पडतात.

Leave a Comment