कलर्स मराठीवर सल्या-बाळ्या फोडणार हास्याची हंडी !


कलर्स मराठीवर अलीकडेच सुरु झालेला ‘कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस’ या कार्यक्रमातील विनोदवीर, त्यांची अतरंगी पात्रे, खुशखुशीत विनोदशैली यांनी प्रेक्षकांना पोट धरून हसण्यास भाग पाडले आहे. या मंचावर आता ‘सैराट’ या चित्रपटातून अमाप लोकप्रियता मिळवलेले सल्या आणि बाळ्या म्हणजेच अरबाज शेख, तानाजी गालगुंडे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. कलर्स मराठीवरील कॉमेडीची जीएसटी एक्सप्रेस या कार्यक्रमामधून प्रेक्षकांना भरपूर हसवणार आहेत. १४ आणि १५ ऑगस्टला रात्री ९ वा.प्रेक्षकांना हा भाग बघायला मिळणार आहे. दहीहंडी विशेष भागामध्ये जीएसटी च्या मंचावर

कार्यक्रमामध्ये दोघांच्या येण्याने हास्याचे स्फोट फुटले, दोघांनी संदीप पाठक यांच्याबरोबर कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळली. संदीप, सल्या आणि बाळ्या तिघांनी मिळून पथकाच्या मुलांसोबत झिंगाट या लोकप्रिय गाण्यावर मनसोक्त डान्स केला. या कार्यक्रमाच्या एका भागामध्ये सल्या आणि बाळ्या या दोघांना वेगळ्याच रुपात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या भागामध्ये सल्या कृष्ण तर बाळ्या पेंद्याची भूमिका करणार आहे तसेच संदीप पाठक मावशीच्या रुपात दिसणार आहेत. या तिघांनाही मिळून मंचावर धुमाकूळ तर घातलाच आणि प्रेक्षकांना सल्या आणि बाळ्या यांनी मिळून भरपूर हसवले.