निपुण धर्माधिकारीच्या ‘बापजन्म’चा टिझर लाँच


नुकताच निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित आगामी बापजन्म या चित्रपटाचा टिझर लाँच करण्यात आला आहे. आपल्याला या चित्रपटात एका नव्या ढंगात कसलेला अभिनेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते सचिन खेडेकर दिसणार आहेत.

चित्रपटाच्या नावावरूनच चित्रपटाची उत्कंठा वाढते. या टिझरमध्ये एका बापाचे एक रूटिन दाखवण्यात आले आहे. आपला दिनक्रम तो बाप एका डायरीमध्ये लिहून ठेवतो. या टिझरमध्ये आपल्याला सचिन खेडेकर आणि दिल दोस्ती दुनियादारी या मालिकेतून घराघरात पोहोचलेला ‘आशू’ म्हणजे पुष्कराज चिरपुटकर दिसत आहे. त्याचप्रमाणे हे टिझर शेअर करताना असे म्हटले आहे की, बाबांच्या डायरीचे एक पान जिवंत झाले आहे! तुम्हीपण ते जगून पहा! यामुळे चित्रपटाची उत्कंठा वाढत आहे.

संजय छाब्रिया आणि सुमतिलाल शाह यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. युवा आणि प्रतिभाशाली निपुण धर्माधिकारी या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. हा चित्रपटा १५ सप्टेंबर २०१७ला प्रदर्शित होत आहे.