उत्तर कोरियावर हल्ला केला तर आम्ही शांत बसणार नाही -चीन


उत्तर कोरिया आणि अमेरिका यांच्यातील वादाचे पडसाद आता चीनमध्ये पडू लागले आहेत. अमेरिकेने जर उत्तर कोरियावर हल्ला केला तर चीन तटस्थ राहिल. पण जर अमेरिका दक्षिण कोरियाच्या सत्ता परिवर्तनासाठी जर उत्तर कोरियावर हल्ला करीत असेल तर चीन शांत बसणार नाही, असे चीनच्या सरकारी वर्तमानपत्र ग्लोबल टाइम्सने स्पष्ट केले आहे.

ग्लोबल टाइम्स हे चीनच्या सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या विचारसरणीचे वर्तमानपत्र असल्याचे चीनमध्ये मानले जाते. उत्तर कोरियाच्या परमाणू आणि मिसाईल कार्यक्रमामुळे सध्या हा वाद निर्माण झाला आहे. मागील चार वर्षापासून अनेक देश उत्तर कोरियाला याबाबत समजविण्याचा प्रयत्न करीत आहेत की उत्तर कोरियाने आपला परमाणू आणि मिसाइल कार्यक्रम रद्द करावा. पण उत्तर कोरियाने याकडे दुर्लक्ष केले आहे.

उत्तर कोरियाने दावा केला आहे की त्याच्याकडे असे शस्त्र आहेत की ज्यात अमेरिका त्यांच्या रडारवर आहे. उत्तर कोरिया नुकत्याच घेतलेल्या दोन अणूचाचण्यावरून त्यांच्या दावा खरा असल्याचे पश्चिमकडील देशांचे मत आहे. जापान सरकारने नुकतीच आपल्या सरंक्षणाबाबत असलेले श्वेतपत्रिके सांगितले आहे की त्यांच्याकडे पहिल्यापासून लहान अणूबॅाम्ब आहेत. त्यांचा लांब पल्ल्याच्या मिसाईलमध्ये वापर करता येईल.