आदर्श शिंदे करतो आहे मोरयाच्या नामाचा गजर


मोरया तुझ्या नामाचा गजर हे आदर्श शिंदे याने गायलेले गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले असून हे गाणे आदर्श शिंदे यांचा कणखर आवाजामुळे आणखी दमदार झाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे गाणे आणखी लोकप्रिय होत आहे. आदर्श शिंदे यांच्याशिवाय आनंदी जोशी तसेच मंगेश मोरे, आशीष मोरे, मेघा घाडे यांनीही या गाण्याला आपल्या आवाजाची साद दिली आहे. आदर्श याआधी देखील गणपतीची अनेक गाणी गायली आहेत. पण गाणे काही औरच असल्यामुळे ऐकण्यासही चांगले वाटते.