टेस्लाच्या एस १०० डी ने केला नवा विक्रम


इलेक्ट्रीक कार क्षेत्रातील अग्रणी टेस्ला मोटर्सने आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोचला आहे. त्यांच्या पहिल्या प्रॉडक्शन मॉडेल एस १०० डी ने फुल चार्जमध्ये १०७८ किमी अंतर कापले आहे. जानेवारीत हे मॉडेल लाँच केले गेले आहे.

एस १०० डीने हे अंतर कापण्यासाठी २९ तास घेतले व पाच चालक या मोहिमेत सामील झाले होते. यापूर्वी बेल्जियममध्ये या कारने फुल चार्जमध्ये ९०१ किमीचे अंतर पार करून विक्रम नोंदविला होता आता हा नवा विक्रम केला गेला आहे. कंपनीचे सीईओ अॅलन मस्क यांनी एस १०० डी मॉडेलचा हा परफॉर्मन्स अतिशय उत्साहित करणारा असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, फुल चार्जमध्ये १ हजार किमीपेक्षा अधिक अंतर कापणारे हे आमचे पहिलेच मॉडेल आहे.

टेस्लाची मॉडेल थ्री कार सुरवातीपासूनच चर्चेत असून तिचे भारतातील बुकींगही सुरू झाले आहे.२०१८ च्या अखेरीस या कारची डिलिव्हरी दिली जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment