२८ ऑगस्टपासून फेसबुकवर पहा टीव्हीसारखेच कार्यक्रम


सध्याच्या घडीला फेसबुक ही सर्वसामान्यांची अत्यावश्यक बनल्याचे चित्र दिसत असून फेसबुकनेही नेहमीच आपल्या युजर्सच्या गरजेनुसार परिस्थितीनुरूप नवनवीन कल्पना अमलात आणल्या. पण आता फेसबुकवर टीव्हीसारखेच कार्यक्रम पाहता येणार असून ‘बिझनेस इनसायडर’ या वेबसाईटने आजच याची घोषणा होण्याची शक्यता असल्याचे वृत्त दिले आहे. आपल्या युजर्सचा विचार करून फेसबुकने खास कार्यक्रम प्रदर्शित करण्यास सुरुवात केली तर त्याचा सर्वात मोठा धक्का टीव्ही चॅनेल्सना बसेल, अशी शक्यता वर्तविण्यात येते आहे.

हे कार्यक्रम येत्या २८ ऑगस्टपासून प्रदर्शित होण्यास सुरुवात होईल. काही मर्यादित युजर्सनाच सुरुवातीला त्यांच्या फेसबुकमध्ये Watch असा टॅब दिसेल. विविध कार्यक्रमांची यादी त्यावर क्लिक केल्यावर दिसेल आणि तिथून तुम्ही तुम्हाला आवडणारा कार्यक्रम बघू शकणार आहात. एकूण ४० कार्यक्रम सुरुवातीच्या टप्प्यात दाखविण्यात येतील. विविध स्टुडिओ आणि निर्मिती संस्थांशी फेसबुकने यासाठी करार केला आहे. युजर्सकडून येणारा प्रतिसाद लक्षात घेऊन कार्यक्रमांमध्ये भविष्यात वाढ आणि बदल केले जातील. दरम्यान, फेसबुकच्या कोणत्याही अधिकाऱ्यांनी या संदर्भात औपचारिकपणे कोणतीही माहिती दिलेली नाही.

फेसबुक टीव्ही कार्यक्रम दाखविणार असल्याची घोषणा या वर्षाच्या सुरुवातीलाच करण्यात आली होती. पण फेसबुकची ही सेवा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नव्हती. या नव्या संकल्पनेची सुरुवात सातत्याने अधिकाधिक निर्मिती संस्थांशी करार करण्यात येत असल्यामुळे पुढेही ढकलण्यात आल्याचे ‘बिझनेस इनसायडर’ने म्हटले आहे. फेसबुकशी करार केलेल्या काही निर्मिती संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार २८ ऑगस्टपासून त्यांचे कार्यक्रम फेसबुकवर प्रदर्शित होण्यास सुरुवात होईल.

बादशाहोमधल्या अजय देवगणच्या चुंबन दृश्यावर इमरान हाश्मीने दिली मजेदार प्रतिक्रिया

Leave a Comment