मी जर रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर नोटबंदीला मान्यता दिलीच नसती – जालान


नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये नोटबंदीच्या निर्णयाची घोषणा केल्यामुळे अनेक अडचणींचा सामना देशातील जनतेला करावा लागला होता. आताच्या घडीला नोटबंदीचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. पण त्यावेळी जर मी रिझर्व्ह बँकेच्या सर्वोच्च पदावर असतो तर नोटबंदीला कदापि मान्यता दिलीच नसती, असे स्पष्ट मत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर बिमल जालान यांनी व्यक्त केले आहे. काळ्या पैशांच्या समस्येवर जालीम तोडगा काढायलाच हवा. पण त्यासाठी मुळावरच घाव घातला पाहिजे.

विमल जालान यांनी आपले मत भारत: भविष्य की प्राथमिकता या त्यांच्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. रुपयाची हमी भारत सरकार देत आहे. पण जोपर्यंत कोणतेही मोठे संकट कोसळत नाही, तोपर्यंत मी नोटबंदीला मान्यता दिली नसती, असे ते म्हणाले. कोणते आर्थिक संकट नोटबंदीचा निर्णय घेण्यापाठी घोंघावत होते का? असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी असे कोणतेही संकट नोटबंदीच्या निर्णयावेळी ओढवले नव्हते, असे म्हटले आहे.

Leave a Comment