तब्बल ५ लाख रुपयांना ऑस्ट्रेलियन कंपनीची मेड इन इंडिया रॉयल एनफिल्ड


१ हजार सीसी वी ट्विन इंजिनची रॉयल एनफिल्ड ही बाईक ऑस्ट्रेलियन कंपनी असलेल्या ‘कारबेरी’ मोटारसायकलने तयार केली असून कंपनीतर्फे बनविण्यात आलेल्या या बाईकमध्ये भारतात तयार करण्यात आलेले इंजिन बसवण्यात आले आहे. दोन ५०० सीसीचे इंजिन एकत्र करुन १००० सीसीचे ट्विन इंजिन या बाईकमध्ये बसविण्यात आले आहे.

आता रॉयल एनफिल्डची किंमत तब्बल ४ लाख ९६ हजार रुपये ऐवढी आहे. ग्राहकांना ५० टक्के रक्कम भरुन गाडीचे बुकिंग करता येणार असल्याचे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. या बाईकमधील इंजिन कस्टमाईज्ड असून हे इंजिन अतिशय कार्यक्षम असून कंपनीने सध्या ही गाडी केवळ निर्यात होणार असल्याचे सांगितले आहे. ती केवळ पाहण्यासाठी शोरुममध्ये उपलब्ध आहे. पण ही गाडी ज्या भारतीयांना खरेदी करायची आहे त्यांना वर्षाअखेरपर्यंत वाट पहावी लागणार आहे.

Leave a Comment