जिओच्या नव्या ‘धमाका ऑफर’ची अंबानींच्या मुलीने केली घोषणा


नवी दिल्ली : ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी रिलायन्स जिओ आणखीन एक नवी ऑफर देण्याच्या तयारीत असून मिळालेल्या माहितीनुसार, ग्राहकांना लवकरच या नव्या ‘धमाका ऑफर’चा लाभ घेता येणार आहे. या ऑफरनुसार, कंपनी ५०० रुपयांत १०० जीबी इंटरनेट डेटा देणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर रिलायन्सकडून देण्यात येणारी ही ऑफर लाँन्च केली जाणार आहे. कंपनी होम ब्रॉडबँड सर्व्हिस जिओ फायबर लाँन्च करणार आहे. ग्राहकांना ज्यामध्ये ५०० रुपयांत १०० जीबी डेटा मिळेल. त्याचबरोबर या ऑफरमध्ये इंटरनेटचा स्पीड १ जिबीपीएस असणार आहे. यासंदर्भात माहिती कंपनीच्या बोर्ड डायरेक्टर आणि मुकेश अंबांनी यांची मुलगी ईशा अंबानीने एक ट्विट करत दिली आहे. सुरुवातीला १०० शहरांमध्ये ही सर्व्हिस सुरु करण्यात येणार असल्याचेही ईशा अंबानीने म्हटले आहे.

Leave a Comment