हँडसेट उत्पादनात भारताची कोटीकोटी उड्डाणे- जादा सवलतींची अपेक्षा


भारतीय हँडसेट मार्केटची वाढ प्रचंड वेगाने होत असून असोचेम व केबीएमसी यांच्या संयुक्त सर्वेक्षणात २०१७ सालात या व्यवसायात २५ टक्के वाढ झाली असल्याचे नमूद केले गेले आहे. या काळात तब्बल ३५ कोटी हँडसेटची शिपमेंट झाली असून २०१६ साली हाच आकडा २८ कोटी होता. गेल्या चार वर्षात भारतात स्मार्टफोन अतिशय लोकप्रिय बनले आहेत.

मेक इन इंडिया व स्कील इंडिया या मोहिमांमुळे भारतात हँडसेट उत्पादनात जबरदस्त वाढ झाली असून टेलिकॉम सेवा सुधारणा, रिटेल, उत्पादन, आयटी, ई कॉमर्स इंडस्ट्रीज या सर्वांना याचा फायदा झाला आहे.२०१४ साली एफटीटीएफ ची स्थापना झाली. त्यांचा उद्देश भारतात २०२० पर्यंत हॅडसेट उत्पादन ५० कोटींवर व निर्यात १२ कोटींवर नेणे असा आहे.

निर्यातीत वाढ नोंदविण्यासाठी उत्पादकांना सरकारकडून अजून काही सवलती अपेक्षित आहेत.सरकारकडून सबसिडी दिली जावी असे प्रयत्न केले जात आहेत. सुटे भाग, कच्चा माल यावर कर आकारला जाऊ नये अशीही उत्पादकांची अपेक्षा आहे. चीन व व्हिएतमान मध्ये हँडसेट युनिट सुरू करताना मोठी सूट दिली जाते तशीच सुविधा येथे दिली गेली तर निर्यात व उत्पादनाचे उद्ष्टि सहज गाठता येईल असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

Leave a Comment