सौदी एअरलाईन्स ड्रेस कोड नुसार शॉर्टस, स्कर्टसवर बंदी


सौदी अरेबियाने त्यांच्या सौदी एअरलाईन्समधून प्रवास करू इच्छीणार्‍या प्रवाशांसाठी ड्रेस कोड जाहीर केला असून त्याची माहिती अधिकृत वेबसाईटवर दिली गेली आहे. या ड्रेस कोड चे पालन न करणार्‍या प्रवाशांना विमानात चढू न देणे अथवा प्रवासात मध्येच उतरविण्याचा अधिकार एअरलाईन्स कंपनीने स्वतः कडे ठेवला आहे.

या ड्रेसकोडनुसार पाय दिसणारे कपडे पुरूषही वापरू शकणार नाहीत म्हणजेच शॉर्ट पँट घालून पुरूष प्रवासी विमानात चढू शकणार नाहीत तर महिलांसाठी स्लिव्हलेस व पाय दिसणारे, तसेच पारदर्शक व तंग कपडे वापरण्यास मनाई केली गेली आहे. यामुळे महिला स्कर्ट वापरू शकणार नाहीत. सौदी एअरलाईन्सच्या या नियमावर टीका केली जात असून परदेशी पर्यटकांना सौदी कसे आकर्षित करणार असा सवालही विचारला जात आहे.

Leave a Comment